बेबी मोमीन यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार संपन्न
लोकसत्य न्यूज

चाफळ/उमेश सुतार : चाफळ बीटामार्फत भाग विस्तार अधिकारी बेबी मोमीन यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला.
यावेळी केंद्रप्रमुख रंजना पाटील, केंद्रप्रमुख सुरेखा जाधव, प्राचार्य विजयकुमार काळबागे, अर्जुन पाटील, दादासाहेब गायकवाड, अशोक कोळी, मंथनचे केंद्रप्रमुख उमेश सुतार, रमेश पोतदार, हनुमंत गोंधळी, संजय जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
मोमीन यांनी शिक्षण क्षेत्रात 39 वर्षाचा सेवाकाल पूर्ण केला आहे. चाफळ बीटामध्ये त्यांना तीनच महिन्यापूर्वी शिक्षण भाग विस्तार अधिकारीपदी पदोन्नती मिळाली होती. त्यांनी कमी कालावधीत बीटातील सर्व शाळांना भेटी देत शैक्षणिक गुणवत्तेला चालना देण्याचे काम केले आहे.
केंद्र संचालक दादासाहेब गायकवाड यांनी प्रास्ताविक केले, महेंद्र सावर्डेकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी चाफळ बीटात नव्याने सडावाघापूर, दाढोली, केळवली, कोळेकरवाडी, डेरवण व मजगाव शाळेतील शिक्षकांचे मान्यवरांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले. व्हिडिओ निर्मितीत यश मिळवलेल्या अजय मोकाशी, विजय वाघेरे, वर्षा आगदिघे, खैरे, जाधव यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी सोमनाथ पोतदार, मनीषा मोहिते, आर आर पाटील, विजयकुमार काळबागे, अर्जुन पाटील, सुरेखा जाधव, सपकाळ, रंजना पाटील, फैयाज भोकरे, भाग शिक्षण विस्तार अधिकारी संजय यादव यांनी मनोगत व्यक्त केले तर उपस्थितांचे रमेश पोतदार यांनी आभार मानले.



