दामले प्रशालेतील गणेश मूर्ती कार्यशाळेत ३०० विद्यार्थ्यांचा सहभाग
लोकसत्य न्यूज

पुणे-गुलटेकडी/प्रतिनिधी : येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या कै. कॅ. शिवरामपंत दामले प्रशालेचे मार्गदर्शक मा. मुख्याध्यापक श्री. रमेश वसईकर सर यांच्या अध्यक्षतेखाली व जेजुरी खंडोबा देवस्थानचे ट्रस्टचे माजी अध्यक्ष डॉ. श्री. प्रसाद खंडागळे, हेन्कल अदेजीव टेक्नॉलॉजी, भारत विकास परिषद, रोटरी क्लब पुणे, लायन्स क्लब, सहकार नगर यांच्या संयुक्त विद्यमाने श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण रक्षण व संवर्धनाचे महत्व समजावे व ‘पर्यावरण रक्षण हेच आमचे शिक्षण’ मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी शाडू माती पासून गणेश मूर्ती कार्यशाळाचे आयोजन दामले प्रशालेमध्ये करण्यात आले होते.
“शाडूपासून गणेश मूर्ती कार्यशाळा” या निमित्ताने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. यशवंत निकमसाहेब, लायन्स क्लब ऑफ पुणे चे अध्यक्ष श्री. अजित मांजरेकर, भारत विकास परिषदेच्या सौ. प्रतिमा खांडेकर, सौ. रोहिणी गरुड, सामाजिक कार्यकर्ते श्री. गणेश हेरला , चित्रकार कविता देशमुख शिल्पकार ललित धनवे शिल्पकार प्रसाद मोडक करह स्टुडिओचे प्रमुख रविराज रैनाक, उपक्रमशील कला शिक्षिका सौ. मेधा हिंगे, शिक्षक व सहभागी विद्यार्थी उपस्थित होते.
पर्यावरणपूरक शाडू मातीपासून उत्साहपूर्ण वातावरणात इयत्ता पाचवी ते नववीच्या ३०० विद्यार्थ्यांनी आकर्षक गणेश मूर्ती तयार करण्याचा मनस्वी आनंद लुटला.यात प्रशालेच्या उपक्रमशील कलाशिक्षिका सौ. मेधा हिंगे यांच्या उत्तम संयोजन व व्यवस्थापनामुळे हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला.
पुढीलवर्षी या उपक्रमात ५०० विद्यार्थ्यांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदविण्याचा मानस प्रशालेचे मा. मुख्याध्यापक श्री. वसईकर सर यांनी व्यक्त केला. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत, पर्यावरण रक्षण व संवर्धन करण्याचा संदेश दिला. यावेळी उत्कृष्ट मूर्ती बनविलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.बजरंग जाधव सर यांनी केले, उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचा सहभाग लाभला.




