
चाफळ/उमेश सुतार : शासन व जनतेचा दुवा बनत गावात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रामाणिकपणे काम करीत आपली संपूर्ण सेवा सत्कारणी लावण्याचे काम पोलीस पाटील दादासाहेब हजारे यांनी केले असल्याचे प्रतिपादन पोलीस उपनिरी्षक रामराव वेताळ यांनी केले.
जाळगेबाडी (ता.पाटण) गावचे पोलीस पाटील
दादासाहेब पांडूरंग हजारे यांच्या सेवानिवृत सत्कार प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पोलीस हवालदार सिध्दनाथ शेडगे, पोलीस पाटील दत्तात्रय चंदूगडे, उमेश पवार, सचिन डांगे, बाळासो चव्हाण, शेखर देशमुख, दीपक पवार, संजय माथने, इरफान मुल्ला, योगेश पवार, सागर चव्हाण, मनीषा तावरे, सुजाता पाटील, राणी जाधव, जयश्री मोहिते आदी उपस्थित होते.
हजारे यांनी सन १९९२ ते २०२५ या २४ वर्षाच्या सेवाकाळात उत्तमरीत्या काम करीत आपली जबाबदारी चौक बजावली आहे. कोणत्याही राजकीय पक्षाशी निगडित न राहता आपले काम चांगल्या प्रकारे केले आहे. त्यांचा संपूर्ण कार्यकाळ विना तक्रार पूर्ण केला आहे.
यावेळी उपस्थित सर्वच पोलीस पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश पवार यांनी केले, प्रास्ताविक दत्तात्रय चंदुगडे यांनी केले, बाळासाहेब चव्हाण यांनी आभार मानले.



