
चाफळ/उमेश सुतार : विद्यार्थ्यांच्या बौध्दिक विकासासाठी नाणेगाव केंद्राने स्पधों परिक्षासाठी राबावलेला नाणेगाव पॅटर्न हा सर्वांसाठी दिशादर्शक ठरला आहे. या केंद्राचा आदर्श बिटातील इतर केंद्रानी घ्यावा, असे प्रतिपादन भाग शिक्षण विस्तार अधिकारी वंदना देशमाने यांनी केले.
नाणेगाव केंद्राचे केंद्र संचालक दादासाहेब गायकवाड यांच्या सकल्पनेतून गत वर्षापासून सुरू करण्यात आलेल्या केंद्रस्तर स्पर्धा परीक्षा नवोपक्रमाचे उद्धाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी सुरेश साळवे, दादासाहेब गायकवाड, बी. जे, पानस्कर, सतीश कवठेकर, संदीप मुळगावकर, अतुल तोंडरे, संजीवनी साळवे, सुजाता उंडे, रजनी गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
देशमाने म्हणाल्या, नाणेगाव केंद्राने गतवर्पींपासून स्पर्धा परीक्षेचा नाणेगाव पॅटर्न हा उपक्रम राबविल्याने याचा विद्यार्थ्यांना चांगलाच फायदा झाला आहे. या कंद्रातील विद्यार्थ्यांची प्रज्ञा शोध परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, मंथन परीक्षा, नवोदय, सैनिक स्कूल यासाठी निवड झाली आहे. ही बिटच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे.
दादासाहेब गायकवाड म्हणाले, स्पर्धा परीक्षेत आपला विद्याथीं टिकला पाहिजे, यासाठी हा उपक्रम केंद्रस्तरावर राबवित आहे. या उपक्रमास केंद्रातील सर्वच शिक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. यापुढील काळातही प्रत्येक स्पर्धा परीक्षामध्ये या केंद्रातील मुले निश्चितच गुणवत्तेत अग्रस्थानी राहतील, असा विश्वास गायकवाड यानी व्यक्त केला.
तज्ञ शिक्षिका वैष्णवी मोरे यांनी नवउपक्रमाच्या बार्पिक नियोजनाचे पीपीटीद्वारे सादरीकरण केले. यावेळी लक्ष्मण जगताप, रूपेश वळसे, सोनाली गायकवाड, सुरेश साळवे, बी. जी. पानस्कर यांनी मनोगत व्यक्त केले दादासाहब गायकवाड यांनी ग्रास्ताविक केले. रोहिणी शिंदे यांनी सून्रसचालन केले . प्रकाश गोलवड यांनी आभार मानले.
गुणवंत विद्यार्यांचा सन्मान नाणेगाव केंद्राने पहिल्याच वर्षी स्पर्धां परीक्षेचा नाणेगाव पॅटन यशस्वी करत विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धां परीक्षेत उज्वल यश सपादन केले आहे. नाणगाव केंद्रातून मंथन परीक्षेत २३, प्रद्याशोध परीक्षेत १२, शिष्यवृत्तीसाठी ७, नवोदयसाठी १, सैनिक स्कूलसाठी निवड झालेल्या १, अशा एकूण ४५ विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.



