निगडी/पुणे : नवनगर शिक्षण मंडळ, आकुर्डी संचलित श्री सरस्वती प्राथमिक विद्यामंदिर आकुर्डी या शाळेमध्ये विद्यार्थी प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
शाळेच्या पहिल्याच दिवशी उपस्थित असलेल्या सर्व मुलांवर पुष्पवृष्टी करत मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले तसेच शाळेतील महिला शिक्षकांनी सर्व मुलांचे औक्षण केले.

शाळेचे संस्थापक सचिव श्री गोविंद राव दाभाडे यांच्या हस्ते उपस्थित मुलांना पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तके देण्यात आली. त्याचबरोबर सर्व मुलांना शैक्षणिक साहित्य शाळेतर्फे देण्यात आले. पहिल्याच दिवशी पुस्तके मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत झाला.
उपस्थित विद्यार्थ्यांसाठी शाळेतर्फे सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला होता. सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या पहिल्या दिवसाची उपस्थिती नोंदवत सेल्फी फोटो आनंदाने घेतले. विद्यार्थ्यांना शाळेमध्ये सोडण्यासाठी आलेल्या पालकांचे देखील तुळशीची रोपे देऊन आभार मानण्यात आले.
यावेळी प्रवेशोत्सवात शाळेचे मुख्याध्यापक श्री राजू माळे सर, शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकवर्ग उपस्थित होते.




