पाल/लोकसत्य न्यूज : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट कराड उत्तर तर्फे पाल गावचे सुपुत्र व देवराज दादांचे निष्ठावंत सहकारी मा. श्री. नजीर हनीफ सुतार यांची कराड उत्तर अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माजी सहकार आणि पणन मंत्री, आमदार बाळासाहेब पाटील आणि पाल जिल्हा परिषद गटाचे नेते मा. श्री. देवराज दादा पाटील यांच्या हस्ते सत्कार समारंभ संपन्न झाला.

माजी सहकार आणि पणन मंत्री, आमदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते नजीर सुतार यांना उपाध्यक्षपदाची निवड झाल्याबद्दल सर्टिफिकेट आणि पुष्पगुच्छ देऊन भावी वाटचालीस शुभेच्छापर संबोधण्यात आले.

यावेळी मानसिंगराव पाटील काका, महेश पाटील, नूरमहंम्मद सुतार, अकिल मुल्ला, निजाम मुजावर, शरीफ मुल्ला, राजेंद्र चव्हाण, योगेश नलवडे, रफिक सुतार, महंम्मद सुतार सर , इकबाल आतार, शब्बीर मांगलेकर, जमीर मुल्ला माजी सरपंच, बादशाह सुतार, संजय गोरे, उद्धव फाळके, अरुण पाटील, इंगळे गुरुजी, विनोद काळभोर, असलम सुतार, राजेंद्र जाधव सर, समीर मुल्ला, भास्कर गोरे, सर्जेराव खंडाईत तसेच पाल आणि भागातील नागरिक व नामांकित मान्यवर आणि मुस्लिम समाजाचे लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




