शेतकरी संघटनेमार्फत सर्वांना समान हक्क : वासिम इनामदार
लोकसत्य न्यूज

कराड, प्रतिनिधी : कोणीही बेकायदेशीर पैशाची मागणी करत असेल तर त्याचा व्हिडिओ काढा तुमचा ऊस त्याच टायमाला कारखाना वर घालवण्याची जबाबदारी शेतकरी संघटनेची राहील, असे ठाम मत शेतकरी संघटनेचे कराड उत्तरचे अध्यक्ष वसीम इनामदार यांनी मांडले.
भागातल्या सर्व शेतकऱ्यांना हे नम्र विनंती. की कारखान्याचे ऊसतोड कामगार येण्यास सुरुवात झालेली आहे. तोडणी, वाहतुकीचे व कुट्टी एन्ट्री शेतकऱ्यांना देणे लागत नाही. कारण की कारखाना आपल्याला तोडणी वाहतुकीचे पैसे वजा करून आपल्याला दर जाहीर करत असतात. त्यामुळे कोणीही बेकायदेशीर पैशाची मागणी करत असेल तर त्याचा व्हिडिओ काढा तुमचा ऊस त्याच टायमाला कारखाना वर घालवण्याची जबाबदारी शेतकरी संघटनेची राहील.
स्वतःच्या कष्टाच्या पैशासाठी स्वतः उभे राहिले पाहिजे. उसाचे वाडे 4 रुपयाला वीस काड्या या पद्धतीने खरेदी करा ते पण बिचारे शेतकरीच आहे. पूर्वी निम्मी निम्मी वाडे मिळत होते परंतु काही नोकरवर्ग शेतकऱ्यामुळे हे वाडे विकत आपल्याला घ्यावे लागत आहे.
तोडणी वाहतुकीचे कुठल्याही शेतकरी ने बेकायदेशीर पैसे देऊ नका आपली चाललेली लूट आपणच थांबऊ शकतो. असेही जनसेवक कराड उत्तर शेतकरी संघटनाचे अध्यक्ष वसीम एम इनामदार यांनी पुढे सांगितले.



