निसार फौंडेशनच्या वतीने पोस्ट ऑफिस योजनांच्या मेळाव्याचे आयोजन
लोकसत्य न्यूज
कोंडवा (लोकसत्य न्यूज) : आज दि. 27 व 28 जून 2024 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत आरोग्य, शैक्षणिक आणि महिला स्वयंरोजगार या क्षेत्रात काम करणार्यांना शासकीय योजनांचा लाभ घेता यावा यासाठी निसार फौंडेशनमार्फत विविध योजना राबविल्या जात असल्याची माहिती हाफिज शेख यांच्या मार्फत देण्यात आली.
पोस्ट ऑफिसच्या विविध योजना खालीलप्रमाणे:-
1. पोस्ट ऑफिस SB बचत खाते
2. पोस्ट ऑफिस RD खाते
3. पोस्ट ऑफिस सुकन्या समृद्धी खाते 4. पोस्ट ऑफिस TD खाते
5. पोस्ट ऑफिस डिजिटल IPPB ऑनलाईन खाते
6. पोस्ट ऑफिस PLI /RPLI इन्शुरन्स खाते 7. पोस्ट ऑफिस लेक लाडकी योजना (1 दिवस ते 14 महिने मुलींसाठी )
8. मातृवंदना खाते
9. P.M. किसान खाते
10. विद्यार्थी(student )
स्कॉलरशिप खाते
11. सर्व प्रकारचे सरकारी सबसिडी खाते
12. लहान मुलांचे आधार कार्ड
(5 वर्षे आतील मुलांचे फक्त )
13. आधारकार्डला मोबाईल नंबर लिंक करून मिळेल
14. पाच वर्षावरील मुलांचे तसेच मोठ्या लोकांच्या आधारकार्डसाठी नाव नोंदणी करून टोकन दिले जातील आणि पुढील कार्यशाळेमध्ये आधार कार्ड बनवले जातील.
15. या सर्व पोस्ट ऑफिस कामासाठी पोस्ट ऑफिसचे कर्मचारी येतील.
यासाठी कोणतेही खर्च लावले जाणार नाही. जी रक्कम भरली जाणार त्याची पावती मिळेल आणि पासबुक काही दिवसात कोंढवा खुर्द पोस्ट ऑफिस, भाग्योदय नगर, पिताश्री आश्रम, कोंढवा खुर्द, पुणे-411048
येथे मिळेल.
तसेच कोंढवा खुर्द, पोस्ट मास्टर यांच्याशी पुढील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा 7620252343, 9763910748 असेही हाफिज शेख यांनी सांगितले.



