लहान मुलांना आरोग्य किट वाटप व नर्सिंग विद्यार्थिनीचे समुपदेशन कार्यशाळा संपन्न
लोकसत्य न्यूज
पुणे, लोकसत्य न्यूज : निसार फाउंडेशन तर्फे आज लहान मुलांना आरोग्य किट वाटप करण्यात आले ज्यामुळे लहान मुलांना निरोगी राहण्याची सवय लागेल, व नर्सिंग विद्यार्थिनीचे समुपदेशन कार्यशाळा कार्यक्रम संपन्न झाला.
ह्या वेळेस आयजीसी फोरम – निसार फाउंडेशन सेंटर फॉर व्होकेशनल ट्रेनिंगचे नर्सिंग अभ्यासक्रमाचे विद्यार्थिनींनी व टीचर शाहिस्ता शेख ह्यांनी लहान मुलांना चांगल्या सवयी व वाईट सवयी (Good Habit & Bad Habit) संदर्भात माहिती दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री जमील चिनिवार कौन्सेलर, निसार फाउंडेशन यांनी मुलांना व त्यांचे पालकांना मार्गदर्शन केले, सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री चाँदभाई बळबट्टी यांनी केले.

ह्या प्रकारचे मुलांना व पालकांना विविध प्रकारे मार्गदर्शन करण्याचे सेमिनार वेळोवेळी घेणार असं निसार फाउंडेशनचे अध्यक्ष श्री हफीज शेख यांनी सांगितले.




