
चाफळ (उमेश सुतार) : माजगाव चाफळ या रहदारीच्या मुख्य रस्त्याकडेला असलेली धोकादायक झाडे कधीही उन्मळून रस्त्यावर पडण्याचे बेतात असल्याबाबतचे प्रसिद्ध केले होते, याची तात्काळ दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर धोकादायक झाड हटविल्याने प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
माजगाव ते चाफळ या मुख्य रहदारीच्या रस्त्यावर अनेक छोटी-मोठे झाडे रस्त्याचे बाजूला जुळलेल्या अवस्थेत आहेत. या परिसरात वाऱ्यासह पडणाऱ्या पावसाचे प्रमाण जास्त असल्याने या मार्गावरील धोकादायक झाडे रस्त्यावर तसेच प्रवाशांच्या अंगावर पडण्याची भीती व्यक्त केली जात होती. सध्या अवकाळी पावसाचे अधून मधून थैमान सुरू आहे. अशातच वादळी वारे वळीवाच्या पावसाने वाळलेल्या झाडांना धोका आहे, अशी झाडे काढण्याची नितांत गरज आहे. याबाबत आवाज उठविताच बांधकाम विभागाला जाग आली.
रविवारी संबंधित ठेकेदारांनी या रस्त्यावरील धोकादायक झाड तत्काळ हटवले. मात्र या रस्त्यावरील अद्यापही काही झाडे धोकादायक स्थितीत असून ती ही हटवण्याची मागणी प्रवाशांमधून जोर धरत आहे.
सर्व धोकादायक झाडे हटवा…
चचेगाव चाफळ या रहदारीच्या मुख्य रस्त्यावर अद्यापही अनेक धोकादायक झाडे उभी आहेत. प्रचंड वाऱ्यासह येणाऱ्या पावसाच्या तडाख्यात ही झाडे केव्हाही पडण्याची भीती आहे. त्यामुळे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याने याची प्रत्यक्ष पाहणी करून रस्त्याच्या दुतर्फा असणारी सर्व धोकादायक झाडे हटवण्याची गरज आहे, असे शिवाजीराव पाटील माजी गटविकास अधिकारी यांनी म्हटले आहे



