महाराष्ट्र राज्यच्या वतीने सातारा जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवाना भेट…
लोकसत्य न्यूज

सातारा/लोकसत्य न्यूज : कृषि विकास अधिकारी सातारा जिल्हा परिषद, सातारामार्फत दिनांक 07/06/2024 रोजी बियाणे या घटकास मंजूरी मिळालेली आहे. त्यामुळे सध्या फक्त बियाणे साठीचे अर्ज पंचायत समितीमध्ये करावेत असे आवाहन जिल्हा परिषद कृषि विभागाचे वतीने करणेत येत आहे.
बियाणे या घटकाचे अर्ज थेट पंचायत समितीमध्ये स्विकारले जातील. इतर घटक उदा. कडबाकुटटी, ताडपत्री, सायकल कोळपे, विद्युत पंपसंच यांचे अर्ज ऑनलाईन करणेचे आहेत. परंतु तुर्तास बियाणे या घटकास मंजूरी मिळाली असून इतर घटक म्हणजे कडबाकुटटी, ताडपत्री, सायकल कोळपे, विद्युत पंपसंच यांची मंजूरीची प्रकिया चालू आहे.
सदर इतर घटकांचे अर्ज करणेच्या प्रक्रियेबाबत लवकरच कळविले जाईल. त्यामुळे सध्या फक्त बियाणे या घटकाचे अर्ज थेट पंचायत समितीमध्ये स्विकारले जातील. याची सर्व शेतक-यांनी नोंद घ्यावी अशी विनंती कृषि विकास अधिकारी सातारा जिल्हा परिषद, सातारा यांच्या मार्फत करण्यात आली आहे.



