
चाफळ (उमेश सुतार) : केंद्रशाळा नाणेगाव खुर्द, बीट चाफळ येथे केंद्रस्तर स्पर्धा परीक्षा नवोपक्रम उद्घाटन समारंभ संपन्न झाला, यावेळी कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन,आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आली.
उपस्थित मान्यवरांचे शाल, श्रीफळ आणि पुष्कगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच स्पर्धा परीक्षा उपक्रम अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी संतोष कोलते सर, रोहिणी बाड मॅडम, श्री लक्ष्मण जगताप सर, श्री शंकर कोळपे सर या शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले तर चव्हाणवाडीचे वैष्णवी मोरे मॅडम यांनी उपक्रमाचे सादरीकरण केले.

श्री अर्जुन पाटील सर माजी केंद्रप्रमुख यांनी मान्यवरांना शुभेच्छा देऊन आपले मनोगत व्यक्त केले, श्री सुरेश साळवे सर माजी मुख्याध्यापक आणि उमेशजी सुतार संपादक चाफळ नगरी यांनी व अनिल कोळी सर प्र. केंद्रप्रमुख, श्री पानस्कर सर मुख्याध्यापक यांनी सुद्धा मान्यवरांना शुभेच्छा देऊन आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री दादासाहेब गायकवाड प्रभारी केंद्रप्रमुख यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिता साळुंखे मॅडम यांनी केले. आभार प्रदर्शन श्री रुपेश वळसे सर कवठेकरवाडी यांनी केले.



