
कात्रज, (प्रतिनिधी) : कात्रज-कोंढवा रस्त्याचे अनेक दिवस रखडलेले भूसंपादनाचे काम मार्गी लागण्याची शक्यता आहे. भूमिअभिलेख खात्याच्या माध्यमातन रस्त्याच्या मोजणीच्या काम वेगाने सुरू करण्यात आले असून ‘ कात्रज भागातील मोजणी जवळपास पूर्ण झाली आहे, कौंढवा भागातील मोजणीचे काम पुढील दोन ते तीन दिवसांत पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
कात्रज चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कात्रज- कोंढवा रस्त्याचे काम वेगाने होणे गरजेचे आहे. याकरीता गेल्या अनेक दिवसांपासून महापालिकेकडून खासगी मालकीची जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. याकामी दोन आठवड्यांपूवी आयुक्तांसह संबंधीत विभागातील अधिकाऱ्यांनी सदर जागेची पाहणीही केली होती. त्यानसार आयुक्तांनी भूसंपादनाची प्रक्रिया’ तातडींने पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. यानुसार १५ दिवसांत रस्ता खुला करण्यात येईल, असा दावा करण्यात येत होता.

या पार्श्वभूमीवर रस्ता रस्ता मोजणी, भूसंपादनाच्या कामाला वेग आला आहे. पथ विभागाने या ठिकाणी त्वरित रस्ता करण्याचे काम सुरू केले असून सिमेंट काँक्रीटचा रस्ता तयार केला आहे. परंतू कात्रज चौकातून कोंढव्याकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी अद्यापही खुला केलेला नाही. याकरीताच्या भूसंपादनाला वेग आला आहे, त्यामुळे येत्या महिन्याभरात हा रस्ताही सुरू होइल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.




