प्राचार्या संध्या कांबळे राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित
लोकसत्य न्यूज

राजगुरुनगर, (लतीफ शाह) : खेड तालुका एज्युकेशन सोसायटी संचालित महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या संध्या कांबळे यांना २०२५ च्या राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.
जन आरोग्यम परिवार संचालित जाणीव फाउंडेशन, संगमनेरच्या वतीने दरवर्षी शैक्षणिक, सामाजिक, कृषी व वैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान केले जातात.

यावर्षी विविध क्षेत्रातील एकूण ३५ मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. संगमनेर येथील थोरात महाविद्यालयाच्या के. बी. दादा देशमुख सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
नाशिक पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी माजी शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते.

प्राचार्या संध्या कांबळे यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल खेड तालुका एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष हरिभाऊ सांडभोर, उपाध्यक्ष अजित लुणावत, मानद सचिव एअर कमोडर गणेश जोशी, सर्व संचालक मंडळ, महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व अधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.



