
कात्रज (लोकसत्य न्यूज) : दत्तनगर- जांभूळवाडी रोड, गवळीवाडा, आंबेगाव खुर्द, पुणे येथील सोनाराच्या दुकानातील सेल्समन नामे सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या इसमास भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनने अटक केली असून भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 519/2040 भादंवि कलम 381 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, दि. 16.6.2024 रोजी फिर्यादी याचे दत्तनगर मध्ये सोन्याच्या दुकानामध्ये सेल्समन नामे विवेक वसंत दाभोळकर, वय 31, रा. फ्लॅट नंबर 5, समर्थ अपार्टमेंट, जाधवनगर, रायकर मळा, धायरी, पुणे याने सोन्याचे दागिने चोरल्याचे उघडकीस आले आहे. दाखल गुन्ह्यातील आरोपी यांचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे, सचिन गाडे यांना सदरचा आरोपी हा धायरी रायकर मळा येथे थांबला आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाली, त्यानुसार तपास पथकाचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी धायरी, रायकर मळा, जाधवनगर येथे जाऊन नमूद आरोपीचा शोध घेतला असता तो मिळून आल्याने त्यास अटक करून त्याच्याकडून पाच लाख रुपयांचे सात तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

सदरची कामगिरी मा. पोलीस उप आयुक्त परिमंडल 2, श्रीमती स्मार्तना पाटील, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, श्रीमती नंदिनी वग्याणी यांचे मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. डी. एस. पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. शरद झिने, तपास पत्रकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर कदम, पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता, पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे, सचिन गाडे, सचिन सरपाले, शैलेश साठे, नामदेव रेणुसे, चेतन गोरे, महेश बारवकर, हनुमंत मासाळ, निलेश ढमढेरे, मंगेश पवार, निलेश जमदाडे, सतीश मोरे, अवधूत जमदाडे, निलेश खैरमोडे, विक्रम सावंत, अभिनय चौधरी, मितेश चोरमले यांच्या पथकाने केली आहे.



