महाराष्ट्रग्रामीण
हुल्लडबाजी करणाऱ्या 55 वाहनांवर पोलिसांची कारवाई
चाफळ दूरक्षेत्र हद्दीत कारवाई, छत्तीस हजार रुपयांचा दंड वसूल

चाफळ/उमेश सुतार :
चाफळ परिसरात पर्यटनाला आलेल्या हल्लडबाज युवकांवर मल्हारपेठ पोलिसांनी पोलिसि शाख्या दाखवत रविवारी कारवाई करण्यात आली. मोटार वाहन कायद्याचा भंग करणाऱ्या सुमारे 55 वाहनावर चाफळ पोलीस सदूरक्षेत्राच्या हद्दीत कारवाई करीत त्यांच्याकडून सुमारे 36 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
मल्हारपेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मछले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन पोटे, पोलीस उपनिरीक्षक रामराव वेताळ, पोलीस हवालदार मोरे, संदीप घोरपडे, पोलीस कॉन्स्टेबल सिद्धनाथ शेडगे, गृहरक्षक निकम, यादव यांनी मल्हारपेठ पोलीस ठाणे अंकित चाफळ दूरक्षेत्र हद्दीत डेरवण येथे नाकाबंदी करून 55 वाहनावर मोटर वाहन कायद्यांतर्गत कारवाई करून 36 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे.



