लतीफ शाह यांना रोटरी क्लब ऑफ राजगुरुनगरचा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्रदान
लोकसत्य न्यूज

राजगुरुनगर, दि. ६ (लतीफ शाह) : रोटरी क्लब ऑफ राजगुरुनगर यांच्यातर्फे महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक लतीफ शाह यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे.
शिक्षक दिनानिमित्त शिक्षक व विद्यार्थी गुणगौरव समारंभ महात्मा गांधी विद्यालयाच्या बाफना रंगमंदिर सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी सिद्धार्थ चव्हाण, राजगुरुनगर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शांताराम बापू घुमटकर, महात्मा गांधी विद्यालयाच्या प्राचार्या संध्या कांबळे, खेड तालुका एज्युकेशन सोसायटीचे संचालक गणेश घुमटकर, व्यवस्थापकीय अधिकारी कैलास पाचारणे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त शिक्षक विठ्ठल भोर, जि. र. शिंदे, दगडू पिंगळे, प्राथमिक शाळा जालिंदरनगरचे दत्तात्रय वारे गुरुजी, रोटरी क्लब ऑफ राजगुरुनगरचे अध्यक्ष राजन जांभळे, सचिव निलेश गवते रोटरियन्स विद्यार्थी, शिक्षक व पालक उपस्थित होते.

यावेळी खेड तालुक्यातील इस्त्रो व नासा संस्थेस भेट देण्यासाठी निवड झालेल्या सहा प्रज्ञावान विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक व पालक यांचा गुणगौरव करण्यात आला. खेड तालुक्याला जागतिक स्तरावर सन्मान प्राप्त करून देणारे दत्तात्रय वारे गुरुजी व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १३ अध्यापकांना सन्मानित करण्यात आले.

पर्यवेक्षक लतीफ शाह यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल खेड तालुका एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष हरिभाऊ सांडभोर, उपाध्यक्ष अजित लुणावत, मानद सचिव एअर कमोडर गणेश जोशी, सर्व संचालक मंडळ, महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व अधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.




