मध्य रेल्वे प्रशासनाच्या पुढाकारामुळे कराड उत्तर शेतकरी संघटनेचे सोमवारचे आंदोलन स्थगित
ग्रामस्थांचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन

तारगाव/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्याच्या दक्षिण भागातील प्रमुख केंद्र असलेल्या तारगाव येथील रेल्वे भुयारी मार्गाच्या दुरुस्तीबाबत अनास्था दाखविणाऱ्या मध्य रेल्वे प्रशासनाच्या निषेधार्थ कराड उत्तर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष वसीम इनामदार यांनी शेतकरी ग्रामस्थ व विद्यार्थ्यांसह सोमवारी ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, रविवारी दुपारी चार वाजता रेल्वे प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी जाऊन चर्चेद्वारे हा प्रश्न मार्गी लावला आहे आणि हा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याचा शब्द दिला आहे.
या संदर्भात माहिती देताना वसीम इनामदार यांनी सांगितले की, मध्य रेल्वे प्रशासनाने तारगाव येथील रेल्वे भुयारी मार्गाचे काम चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे शेतकरी ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत होते. पावसाळ्यात तर या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे मोठे दिव्य होते. सातत्याने प्रयत्न करून आणि मागणी करून देखील रेल्वे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत होते. अखेरीस कराड उत्तर शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवार दि. १५ सप्टेंबर रोजी तारगाव येथे ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला होता.

त्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाचे अधिकारी आणि रेल्वे सुरक्षा दलाचे अधिकारी हे तारगाव येथे दाखल झाले. त्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून घेतले. विनायक भोसले, पर्वती मोरे, ताहेर इनामदार, अमीर मुल्ला आणि हणमंतराव मोरे यांच्यासह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. त्यांच्याशी यावेळी चर्चा करण्यात आली. सध्या मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे, पाऊस उघडल्यानंतर भुयारी मार्गाचा रस्ता तयार करून दिला जाईल, असा शब्द यावेळी देण्यात आला. कोणत्याही परिस्थितीत आंदोलन करू नये, अशी विनंती देखील करण्यात आली.
भुयारी मार्गाचे काँक्रिटीकरण करण्यात यावे, जोपर्यंत भुयारी मार्ग व्यवस्थित होत नाही, तोपर्यंत स्कायवॉकचा वापर करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्याबाबत प्रशासनाने सकारात्मकता दर्शवली आहे, असेही इनामदार यांनी निदर्शनास आणून दिले.

‘रेल्वे प्रशासनाने लोकांच्या जिवाशी खेळ खेळणं बंद करावं” अशा आशयाचं निवेदन आपण तारगाव रेल्वे स्टेशन प्रशासनाला दिलेलं होतं त्यामध्ये तारगाव येथील रेल्वेचा भुयारी मार्ग दुरुस्तीबाबत आपण त्यांना विनंती केलेली होती अन्यथा आम्ही दिनांक १५/०९/२०२५ रोजी ठिय्या आंदोलन करू असं कळवलं होतं परंतु रेल्वे प्रशासनाने ताबडतोब आपल्या या निवेदनाची दखल घेऊन आज रविवार सुट्टी असताना सुद्धा रेल्वे प्रशासनाचे अधिकारी आरपीएफ चे अधिकारी यांनी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना बोलावून घेऊन आपल्या असणाऱ्या समस्येचे निवारण करण्याचं आश्वासन आज या ठिकाणी दिलं त्यावेळी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते प्रामुख्याने विनायक भोसले, परबती मोरे, हनुमंतराव मोरे आणि ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर हजर होते.

रेल्वे प्रशासनाने पाऊस उघडल्यानंतर भुयारी मार्गाचा रस्ता तयार करून देण्याचे आश्वासन शेतकरी संघटनेला दिले आपण कोणतेही आंदोलन करू नका आम्ही काम पूर्ण करून देतो असे आश्वासन दिल्यामुळे आपण उद्या करणारे ठिय्या आंदोलन हे स्थगित करत आहोत.
*प्रमुख मागण्या*
1) रेल्वे प्रशासनाच्या हद्दीतील भुयारी (RUB) रस्ता काँक्रेटी करण करून मिळावा.
2) भुयारी मार्ग(RUB) तयार होईपर्यंत शाळेतील मुलांना व पंचक्रोशीतील लोकांना ये जा करण्यासाठी ( स्काय वॉक ) याचा वापर करण्यास परवानगी मिळावी.
आमच्या ह्या मागण्या मान्य न झाल्यास तारगाव रेल्वे स्टेशन पंचक्रोशीतील चाळीसहून अधिक गावं आहेत आम्ही एक मोठा लढा उभा करून वीस हजार पेक्षा अधिक लोक तारगाव रेल्वे स्टेशनवर ठिय्या आंदोलन वेळप्रसंगी रेल रोको करतील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संपूर्ण जबाबदारी रेल्वे प्रशासनाची राहील अशाप्रकारे ईशारा *कराड उत्तर शेतकरी संघटना अध्यक्ष मा. वसिम मगबुल इनामदार यांनी दिलेला होता.*
आज अशाप्रकारे आपला विजय झालेला आहे आपण दिलेल्या निवेदनाला रेल्वे प्रशासनाने काळजीपूर्वक विचार करून कार्य सिद्धीस नेण्याचे ठरविले आहे.




