
पाटण (उमेश सुतार) : केळोली (ता. पाटण) येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये २२.वषापूर्वी एकाच वर्गात शिकत असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा एकत्र येत शाळा भरली. ब्याच वर्षानी एकत्र आलेले विद्यर्यी-विद्यार्थिनी भारावून गेले होते निमित होते न्यू ईग्लिश स्कूलचा एसएससी २००३-०४ बॅंचच्या माजी विद्यार्थी स्नेह संमेलनाचे. सुरुवातीला गुरुजनांचे “औक्षण करुन सर्व गुरूंचे स्वागत करण्यात आंले.
सर्व विद्यार्थ्यानी आपली ओळख करून देताना शाळेतल्या गमती-जमतीं सांगत जुन्या आठवणीना उजाळा दिला. तसेच समाजात वावरताना एकमेकांवर आलेल्या अडचणीवर मात करण्यासाठी सहकार्य करण्याची भावना वाटला असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. काही जणांनी शाळेमध्ये घालवलेले दिवस सांगत जुन्या आठवणी जाग्या केल्या. दहावीपर्यंत एकच वर्गात खेळीमेळीच्या वातावरणात शिक्षण घेणारे विद्यार्थी आज विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. मुलं खूप मोठी झाली वेल सेटल झाली हे पाहून अभिमान वाटल्याची भावना प्रत्येक शिक्षकांनी आपापल्या भाषणातून व्यक्त केली.
नोकरी व्यवसाय आणि वैवाहिक जीवनात रमलेल्या 2003 च्या दहावीच्या बॅचचे विद्यार्थी तब्बल वीस वर्षानंतर एकत्र आले होते शाळेतील सवंगडी, शाळेचा वर्ग, लाकडी बाक यांची आठवण प्रत्येकाच्या मनात आयुष्यभर घर करून असते, शाळा सोडल्यावर पुन्हा लाकडी बाकावर बसण्याची इच्छा अनेकांच्या मनात येत असतेच यासाठी अशा स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात यावे, अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली. यावेळी माजी विद्यार्थ्यांकडून शाळस १५ हजार रुपयांची देणगी प्रदान करण्यात आली.,
याच वर्गातील सवंगडी कै. समाधान मोरे याच्या वडिलांना या बॅंचकडून पाच इजार रुपयांची मदत देण्यात आली., सूत्रसंचालन पोलीस पाटील व याच बॅचचे माजी.विद्यार्थी दतात्रय चंदुगडे यांनी केले. प्रास्ताविक वर्षा जाधव, आभार राजेंद्र जाधव व अमोल साळुंखे यांनी मानले.



