
पुणे/प्रतिनिधी : दिव्यांग प्रवाशयांना येणाऱ्या अडचणींचे निवारण करून त्यांना उत्तम प्रकारे सोया सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच त्यांना मूलभूत हक़्क़ मिळवून देण्यासाठी दिव्यांग क्षेत्राचे कार्यकर्ते रफ़ीक लतीफ खान यांची मध्य रेल्वेतर्फे प्रवासी समिती मध्ये नियुक्त करण्यात आली आहे.
याबाबत नुकतीच एक मीटिंग डी आर एम कार्यालय पुणे येथे जिल्हाचे विभागीय व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा यांनी घेतली, या मीटिंग मध्ये “दिव्यांगच्या वाहनासाठी आरक्षित विशेष पार्किंग, स्टेशनच्या मुख्यगेट मधून आत जाण्यासाठी व्हीलचेयर उपयोगी रैंप, नवीन व्हीलचेअर्स, सर्व लिफ्ट चालू करावी, बँटरी कारची सेवा दिव्यांगना मोफत द्यावी, डेक्कन क्विन फ्लाट नं. १ वरून सोडावी तसेच त्याची दिव्यांग बोगी फ्लाटावर असावी अशा विविध मागण्या रफ़ीक खान यांनी केल्या.
याबद्दल सकारत्मक प्रतिसाद देऊन लवकरच रेल प्रशासन मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल, अशी प्रतिक्रिया वाणिज्य विभागाचे प्रमुख मिलिंद हिरवे यांनी दिली.



