ताज्या घडामोडी

उत्तरमांड धरणाचा सांडवा पूर्ण

सांडव्यातून पाण्याचा ०.८० क्युसेक्स विसर्ग सुरू

        चाफळ/उमेश सुतार : उतरमांड घरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेलला महिनाभर कमी-जास्त प्रमाणात सुरू असलेल्या पावसाने मुबलक पाणीसाठा झाला आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाची संततथार सुरू असून धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. शुक्रवारी रात्री उशिरा सांडव्यातून पाण्याचा 0.८0 क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सरू झाला असून उत्तरमांड नदीपात्रातील पाण्यात कमालीची वाढ झाली आहे.
चाफळ नजीक गमेवाडी येथे साकारण्यात आलेल्या उत्तरमांड धरणातील पाणी साठवण क्षमता 0.८८ टी.एम.सी.ए. ही असून सध्या धरणात 0.८६ टी.एम. उपयुक्त पाणीसाठा आहे. या धरणातील पाण्याची संचय पातळी ६८७.40 मीटर एवढी असून सद्यस्थितीत संचय पातळी ६८३.७९ मीटरपर्यंत आलेली आहे. या प्रकल्पात नाणेगाव, माथनेवाडी ही गावे पूर्णतः बांधीत झाली आहेत. धरणाच्या पाण्याचा चाफळ विभागातील गावांसह कराड तालुक्यातील खालकरवाडी, चरेगाव, भवानवाडी या गावांना उपयोग होत आहे.

      कमी-जास्त प्रमाणात पडत असलेल्या पावसाने ‘उत्तरमाड धरण पूर्ण क्षमतेने भरले असून सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. १९९७ मध्ये सुरू झालेल्या उत्तरमांड प्रकल्पाचे काम पूर्णत्वास गेले आहे. १ हजार ४२0 मीटर लांब व ४४.४५. मीटर उंच जलसंचय पातळी आहे. गतवर्षंपेक्षा यंदा लवकरच म्हणजे मे महिन्यातच अवकाळी पावसाने सुरवात केल्याने उत्तरमांड धरणातील पाणासाठ्यात वाढ झाली होती. हा पाऊस लागूनू राहिला असतानाच जूनू उजाडला.

     त्यातच मॉन्सूनचे आगमन झाल्याने धरण जून महिन्यातच पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरणाचे पाणलोट क्षेत्रात कमी-जास्त पडत असलेल्या पावसाने धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने सांडव्याद्वारे पाण्याचा विसर्ग होऊ लागला आहे. परिसरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाचे पाणी पातळीत वाढ होऊन क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात पाणीसाठा झाल्याने सांडव्यातून पाणी बाहेर पडू लागले आहे. त्यामुळे उत्तरमांड नदीपात्रात पाणी पातळीत कमालीची वाढ झाला आहे.
नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा ◊
उत्तरमांड धरणामध्ये मुबलक पाणीसाठा झाला असल्याने सांडवा सुरु झाला आहे. सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग होऊ लागल्याने उतरमांड नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांनी नदी पात्रात उतरू नये, असे आवाहन मंडल अधिकारी ए. के. चव्हाण व तलाटी एस. एस. दुधगावकर यांनी केले आहे.

Share

Chief Editor - Raphik Shaikh

"लोकसत्य न्यूज" हे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही या माध्यमातून आपल्याकडे पोहोचत आहोत. प्रत्येक बातमीशी मुख्य संपादक सहमत असतीलच असे नाही तर संबंधीत बातमीला जे ते प्रतिनिधी जबाबदार असतील. आपण आपल्या बातम्या WhatsApp, Email द्वारा आम्हाला पोहचवू शकता. raphik.261175@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!