प्रज्ञा परीक्षेत महात्मा गांधी विद्यालयाची चमकदार कामगिरी

राजगुरुनगर, ता.६ (प्रतिनिधी) : महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळ आणि पुणे जिल्हा गणित अध्यापक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या गणित प्रज्ञा परीक्षेत महात्मा गांधी विद्यालयाने चमकदार कामगिरी केलेली आहे, अशी माहिती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संध्या कांबळे यांनी दिली.
इयत्ता पाचवी मधील ११ व इयत्ता आठवी मधील १० असे एकूण २१ विद्यार्थी प्राविण्य परीक्षेत उत्तीर्ण होऊन प्रज्ञा परीक्षेसाठी पात्र ठरले. सदर परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून प्रज्ञा परीक्षेत विद्यालयातील १० विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे :
आराध्या सावंत, आरोही बोरकर, जयेश गोरडे, सर्वेश भोकसे, तनय गोपाळे, समृद्धी बेंडुरे, ईश्वरी गांजले, आर्या पिंगळे, अर्णव घनवट, श्रेयस रणपिसे, यशस्वी विद्यार्थ्यांना गणित अध्यापक रवींद्र घुमे व कविता मुळूक यांनी मार्गदर्शन केले.
महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या संध्या कांबळे, उपमुख्याध्यापिका अस्मिता पाठक, पर्यवेक्षक सोपान निसरड, रेखा जाधव, हौशीराम मुठे, लतीफ शाह, सुनीता ठाकूर यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
खेड तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सर्व सन्माननीय संचालक मंडळ यांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक अध्यापकांचे कौतुक केले.




