महाराष्ट्रराजकीयसामाजिक
कारखानदारांविरोधात कराड-उत्तर मधून लढवणार निवडणूक: वसिम इनामदार
शेतकरी संघटनेचा उमेदवार भरणार अर्ज
कराड/प्रतिनिधी : ऐन दिवाळीत गेल्या वर्षी तुटलेल्या उसाचा दुसरा हप्ता न दिल्यास विधानसभा निवडणुकीमध्ये शेतकरी संघटना घेणार आक्रमक पवित्रा, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष वसिम इनामदार यांनी कराड उत्तर मधून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. कारण साखर कारखानदारांनी यंदा दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवण्याचे काम केले आहे. त्यामूळे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कराड उत्तरचे शेतकरी संघटना त्यांच्या ताटात 100% माती कालवणार यात शंका नाही.
आता खूप झाली उपोषणे, आंदोलने! आता एकच निर्धार विधानसभेमध्ये शेतकऱ्यांचा हिताचा उमेदवार असणार असा निर्धार वसीम यांनी केलाय. कारखाना चालू करण्यापूर्वी उसाचे दर जाहीर करा, शेतकऱ्यांची ऊस बिले कशी देणार आहात ते जाहीर करा, मगच कारखाना चालू करा, असा शासनाचा स्पष्ट आदेश असून ही कारखानदारांनी गेले दोन महिने बेकायदेशीर काम चालू कसे केले. त्या विरोधात वसिम यांनी सहा दिवसांचे उपोषण कराड तहसीलदार कार्यालय येथे केले होते. तेव्हा जिल्हाधिकारी साहेबांनी संयुक्त बैठक लावून शेतकऱ्यांना 3100 रुपये दर दहा कारखान्यासहीत जाहीर करावयास लावला होता. त्यामुळे वसिम इनामदार यांच्या प्रयत्नांना यश आले होते. पुणे जिल्ह्यातील कारखाने एफआरपी पेक्षा 700 रुपये दर जास्त देऊ शकतो तर आपल्या जिल्ह्यातले साखर कारखान्यानांनी निदान 500 रुपयेचा दुसरा हप्ता तरी काढावा, अन्यथा जशास तसे उत्तर देण्यात येईल असा इशारा वसिम इनामदार यांनी दिला.





