
कात्रज/लोकसत्य न्यूज : यामाहा कंपनीची मोटर सायकल ही कात्रज चौकातील उसाचा रस विक्रीच्या दुकानाचे समोरील बाजूचे रोडवर फिर्यादी यांनी मोटरसायकल ही लॉक करून पार्क केली असता ती कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादी यांचे संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने चोरी केली आहे, म्हणून फिर्यादी यांनी तक्रारीवरून भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 215/2025 कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सावळाराम साळगावकर यांनी तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी व अंमलदार यांना वाहन चोरीचा शोध घेणे बाबतच्या सूचना केल्या होत्या, त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अंमलदार हे वर नमूद गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना त्यांना सदरचा गुन्हा रेकॉर्डवरील आरोपी नामे मिथुन सुगंध लोखंडे, वय 22 वर्षे, राहणार सर्वे नंबर 1035, विनायक हॉटेल समोर, महात्मा गांधी सोसायटी, सहकार नगर भाग 1, सहकारनगर पोलीस स्टेशन बाजूला, पुणे याने केल्याने निष्पन्न झाले असून त्याचे कडून गुन्ह्यातील चोरीस गेलेली यामाहा दुचाकी ही जप्त करण्यात आली असून आरोपीवर पुढील कारवाई करण्यात आली आहे.
सदरची कामगीरी ही पोलीस उप आयुक्त परी 2, पुणे शहर श्रीमती स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग पुणे श्री राहुल आवारे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम पु. साळगावकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री राहुल कुमार खिलारे, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, महेश बारवकर, मंगेश पवार, सचिन सरपाले, सचिन गाडे, निलेश खैरमोडे, तुकाराम सुतार यांच्या पथकाने केली आहे.



