एम. पी. डी. ए. कारवाई केलेल्या आरोपीची अवैध अग्निशस्त्र व एक जिवंत काडतुस बालकाकडून हस्तगत
भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी
कात्रज (प्रतिनिधी) : भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील तपासस पथकाचे अधिकारी पेट्रोलिंग करत असताना एका सतरा वर्षाच्या विधीसंघर्षीत बालकाकडून 50 हजार रुपये किमतीचे एक गावठी बनावटीचे पिस्तल व पाचशे रुपये किमतीचे जिवंत काडतुस मिळाल्याने त्याला अटक केली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, दिनांक 16.5.2024 रोजी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार मंगेश पवार, निलेश खैरमोडे यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत सच्चाईमाता पाण्याची टाकीजवळ, आंबेगाव खुर्द, पुणे येथे एक विधीसंघर्षित बालक वय १७ वर्षे हा त्याचे ताब्यात पन्नास हजार रुपये किमतीचे एक गावठी बनावटीचे पिस्तल व पाचशे रुपये किमतीची एक जिवंत काडतुस असा एकूण पन्नास हजार पाचशे रुपयांचे मुद्देमाल मिळून आल्याने त्याचे कडून सदरचा मुद्देपाल हस्तगत करून त्याच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 404/ 2024, भारतीय हत्यार अधिनियम कलम 3 सह 25, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (1) (3) सह 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालकाकडे तपासामध्ये त्याच्याकडील पिस्तल व काडतुस हे त्याचा मित्र ऋषिकेश राजेंद्र बर्डे, रा. कात्रज, पुणे याने एमपीडीए कारवाई केल्यामुळे त्याच्याकडे ठेवण्यासाठी दिले असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सदरची कामगिरी मा. अमितेश कुमार मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. प्रवीण पवार साहेब, सहाय्यक आयुक्त पुणे शहर, मा. प्रवीणकुमार पाटील साहेब, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे, श्रीमती स्मार्तना पाटील, मा. पोलीस उपअधीक्षक परिमंडल दोन, मा. नंदीनी वग्यानी साहेब, सहायक पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री डी एस पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद झिने, तपास पत्थकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर कदम, पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता, पोलीस अंमलदार मंगेश पवार, निलेश खैरमोडे, सचिन सरपाले, धनाजी धोत्रे, अवधूत जमदाडे, अभिनय चौधरी, सचिन गाडे, निलेश जमदाडे, शैलेश साठे, नामदेव रेणुसे, चेतन गोरे, महेश बारवकर, निलेश ढमढेरे, हनुमंत मासाळ, हर्षल शिंदे, विक्रम सावंत, राहुल तांबे यांच्या पथकाने केली आहे.



