
चाफळ/उमेश सुतार : चाफळ विभागातील चाहूरवाडीत येथे एक आठवडयापासून दोन बैलांमध्ये ‘लम्पी रोगाची लक्षणे दिसून आली असून चाफळ विभागात लम्पीच्या शिरकावाने शेतकरी भयभीत झाला आहे.
संबंधित शेतकऱ्यांनी सद्यस्थितीत खासगी डॉक्टरांकडून लम्पीग्रस्त बैलांवर उपचार सुरू केले आहेत. चाफळ विभाग हा दुर्गम व डोंगराळ असा आहे. या भागातील बहुतांश लोकांचा शेती व्यवसाय आहे. त्यामुळे पाळीव जनावरांची संख्या मोठी आहे पशुपालनावरच अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र गत आठवड्यापासून चाफळ विभागातील चाहूरवाडी येथील शेतकरी मारुती आबा पवार व अमोल आनंदा कोसमकर यांच्या मालकीच्या असलेल्या दोन बैलांमध्ये लम्पीची लक्षणे आढळून आली आहेत. पेरणीच्या तोंडावरच या रोगाने तोंड वर काढल्याने शेतकरी वर्गातून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या दोन बैलापैकी एकाला दहा दिवसापासून लक्षणे दिसून आली आहेत तर दुसऱ्या बैलामध्ये ७ दिवसापासून लक्षणे दिसू येत असल्याचे संबंधित शेतकन्यांनी सांगितले. एकीकडे पावसाअभावी पेरण्या न झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे तर दुसरीकडे लम्पीने डोके वर काढल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.
चाहूरवाडी शिवारात सहा गावाची जनावरे…



