खेड तालुका एज्युकेशन सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
लोकसत्य न्यूज

राजगुरुनगर, दि. १ (लतीफ शाह): पुणे जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य मानल्या जाणा-या खेड तालुका एज्युकेशन सोसायटीची ८७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष हरिभाऊ सांडभोर, उपाध्यक्ष अजित लुणावत, सचिव एअर कमोडर गणेश जोशी, संचालक डॉ. प्रदीप शेवाळे, कैलास सांडभोर, हिरामण सातकर, प्रदीप कासवा, प्रकाश भनसाळी, अॅड.संदीप भोसले, गणेश घुमटकर, रेखाताई क्षोत्रीय, उमाताई सांडभोर, बाळासाहेब सांडभोर, स्वानंद खेडकर, राहुल कुंभार, सर्व विद्यालयांचे मुख्याध्यापक व अधिकारी उपस्थित होते.

सभेच्या सुरुवातीला अहवाल वर्षात निधन झालेले राजगुरूनगर मधील नामवंत उद्योजक प्रदीप लुणावत, सुरेश गुजराथी, विलास खेडकर , सदाशिव थिगळे, ज्ञानेश्वर भुजबळ, पाईट दुर्घटनेत मृत्युमुखी झालेले महिला भाविक, देशासाठी शहीद झालेले जवान यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली.

संस्थेचे सचिव एअर कमोडर गणेश जोशी यांनी गतवर्षीच्या वार्षिक सभेचे इतिवृत्त वाचले. त्यानंतर विषयपत्रिकेवरील विषयांवर सविस्तर विवेचन केले. सर्व सभासदांनी ठराव एकमताने मंजूर करण्यात केले.

यावेळी खेड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या वतीने तयार करण्यात आलेल्या कलादालन, वाचन कक्ष, व्यवसाय मार्गदर्शन केंद्र व स्केटिंग मैदान उद्घाटन करण्यात आले.
यावेळी सभेस ॲड. देवेंद्र बुट्टे पाटील, नानासाहेब टाकळकर, शांताराम घुमटकर, अनिल बाबा राक्षे, माधव संभूस, विनायक घुमटकर, प्रमोद गानू, ॲड. माणिक पाटोळे यांनी चर्चेत सहभाग घेतला. संस्थेचे सचिव सभासदांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली व शंकाचे निरसन केले.

अतिशय उत्साह व खेळमेळीच्या वातावरणात सभा संपन्न झाली. संस्थेचे उपाध्यक्ष अजित लुणावत यांनी आभार मानले.




