सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती तसेच विजयादशमी साजरी…
लोकसत्य न्यूज

आकुर्डी/प्रतिनिधी : येथील नवनगर शिक्षण मंडळाच्या श्री सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती तसेच विजयादशमी शुभेच्छा समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शुभेच्छा समारंभाच्या अध्यक्षस्थानी नवनगर शिक्षण मंडळाचे संस्थापक प्रा. श्री. गोविंदराव दाभाडे सर होते तर सर्व शिक्षक वृंद उपस्थित होता. पाटीपूजन, फलकपूजन, व सरस्वती पूजन करत ईशस्तवनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला.
नेहमी असत्यावर सत्याचा विजय असतो, विनम्रता, अहिंसा, सद्भावना, सदविचार, सत्कर्म माणसाला जीवनात तारून नेते, विजय हा नेहमी सत्याचाच होतो, सत्कर्म, सत्कार्य करण्यासाठी काही प्रयत्नपूरक कालावधी लागतो. परंतु दुष्कर्म प्रयत्नाशिवाय घडते. सत्य हे कटू असते,परंतु ते सत्यच असते, चांगले पेरा, चांगले उगवेल, येणाऱ्या संकटाला सामोरे जाण्याची जिद्द ठेवा.
यश तुमच्या प्रामाणिक प्रयत्नामुळे चरणाशी लोळण घेईल, राष्ट्रप्रेम, देशभक्ती सामाजिक कार्यातूनच घडते, जाज्वल्य इच्छा शक्ति माणसाला विजया कडे घेऊन जाते, राष्ट्रपिता महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन करत उपस्थित सर्व शिक्षकांना विजयादशमीच्या शुभेच्छा देताना, जीवनात संकल्प करा, त्या संकल्प पूर्तीसाठी प्रयत्न करा, असे आवाहन नवनगर शिक्षण मंडळाचे संस्थापक श्री. दाभाडे सर यांनी केले व नवरात्र उत्सव निमित्त गीतगायन करत देवीच्या आराधना केली.
. यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्याबद्दल श्री. राहुल वांगेकर व श्री. अविनाश अखाडे यांनी माहिती दिली तर सौ. मुमताज शेख यांनी भजन सादर केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विकास आंधळे यांनी व प्रास्ताविक श्री.मंगेश अहिरे, तर आभार श्री. अमोल गुंड यांनी मानले, कार्यक्रमासाठी संगीत साथसंगत श्री. प्रकाश कोळप यांनी दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.




