दामले प्रशालेत विज्ञान प्रदर्शन व शैक्षणिक साहित्य निर्मितीला विद्यार्थ्यांकडून भरघोस प्रतिसाद
बजरंग जाधव सर

पुणे-गुलटेकडी : येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या कै. कॅ. शिवरामपंत दामले प्रशालेचे मार्गदर्शक मा. मुख्याध्यापक श्री. रमेश वसईकर सर यांच्या मार्गदर्शन व सक्रिय सहभागाने प्रशालेमध्ये विज्ञान प्रदर्शन व शैक्षणिक साहित्य निर्मिती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रशालेचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री. रमेश वसईकर सर यांच्या शुभहस्ते व शालेय विज्ञान शिक्षक समिती यांच्या उपस्थितीमध्ये प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी प्रशालेचे मा. मुख्याध्यापक श्री. वसईकर सर यांनी सर्व विद्यार्थ्यांना विज्ञान प्रदर्शन व शैक्षणिक साहित्य निर्मिती उपक्रमाच्या निमित्ताने विज्ञानाचे जीवनातील महत्त्व पटवून देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत उपक्रमास हार्दिक शुभेच्छा दिल्या.

यावेळी विज्ञान प्रदर्शन व शैक्षणिक साहित्य निर्मिती उपक्रमाच्या निमित्ताने प्रशालेच्या शालेय प्रयोगशाळा व ग्रंथालयामध्ये विविध वैज्ञानिक, भौगोलिक, नैसर्गिक, आधुनिक प्रकल्पांची मांडणी करण्यात आली होती. यात सहभागी विध्यार्थ्यांनी एअर पॉल्युशन कंट्रोलर, क्रेन, होलोग्राम, मिलिटरी सेफ्टी ड्रोन, हायड्रोलिक ब्रिज, सेंद्रिय शेती, ज्वालामुखी,न्यूटनथेरी, सूर्यग्रहण, रोबोट, सेफ्टी गेट, आधुनिक शहर, सूर्यमाला अशा विविध प्रकल्प व उपक्रमाची माहिती देत सादरीकरणातून शालेय विज्ञान प्रदर्शनाला भेट देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनावरती वैज्ञानिक व भौगोलिक विचार तसेच दृष्टिकोन बिंबवण्याचा प्रयत्न केला.
यावेळी प्रत्येक प्रकल्प सादरीकरणाला विद्यार्थ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळत होता. प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आनंद लुटला.
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक मा. श्री वसईकर सर, पर्यवेक्षक श्री अनिल तंवर सर, शालेय विज्ञान शिक्षक समिती प्रमुख श्री. स्वप्निल सागडे सर, सौ. राजश्री पाटील, श्री. अतुल शिंदे व विज्ञान शिक्षक प्रतिनिधी यांनी विज्ञान प्रदर्शनातील प्रकल्पाचे परीक्षण व मूल्यांकन करत प्रथम तीन प्रकल्पांना मानांकन दिले.
इयत्ता पाचवी ते सातवीचे विभागातून प्रथम क्रमांक “आपत्तीविषयक सूचना “- चि. दराडे गौरव गोविंद ( इयत्ता सहावी अ), द्वितीय क्रमांक-” रेन वॉटर हार्वेस्टिंग “- कु. ओव्हाळ त्रिशिका सचिन ( इयत्ता सहावी- ब ) तृतीय क्रमांक-” नैसर्गिक शेती “- चि.इंगळे स्वराज समीर (इयत्ता सातवी-क) इयत्ता आठवी ते दहावी विभाग- प्रथम क्रमांक-” वायु प्रदूषण नियंत्रण “-कु. गवळी सोनल निनाद व कु. शहारे मुग्धा चेतन( इयत्ता नववी अ) द्वितीय क्रमांक -” अँटी सुसाईड फॅन “-चि. नायडू चेतन योगेश (इयत्ता नववी-अ)
तृतीय क्रमांक-” एअर पॉल्युशन कंट्रोल “-चि. रोहिदास बनसोडे (इयत्ता नववी- अ) समाजशास्त्र विभाग प्रथम क्रमांक -” ज्वालामुखी”-कु. शेलार अनुष्का अश्विनकुमार (इयत्ता नववी अ), द्वितीय क्रमांक -” पृथ्वीचे अंतरंग “- कु. क्षिरसागर पूर्वा रवी ( इयत्ता आठवी ब ) या विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांनी प्राप्त केला, प्रकल्प निर्मितीसाठी सर्व विज्ञान व भूगोल शिक्षकांचे सहकार्य लाभले.
या विज्ञान प्रदर्शन व शैक्षणिक साहित्य निर्मिती उपक्रमाचे सूत्रसंचालन व निवेदन कु.अस्मिता अविनाश पुटगे या विद्यार्थिनींनी केले. विज्ञान प्रदर्शन व शैक्षणिक साहित्य निर्मिती उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.




