चाफळला महाराजस्व अभियानांतर्गत फार्मर आयडी अग्रीस्टँक कँम्पला प्रतिसाद
उमेश सुतार

चाफळ, दि. ८ : उपविभागीय अधिकारी कार्यालय, पाटण व तहसीलदार कार्यालय, पाटण यांच्या विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत महाराष्ट्र शासनाने दि. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या काळात महसूल पंधरवडा साजरा करण्याच्या अनुषंगाने शुक्रवारी चाफळ येथे निवासी नायब तहसीलदार पी. डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फार्मर आयडी ऑग्रीस्टॅक कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमास महसूल सहायक कुबेर भिलवडे, मंडलाधिकारी राजेंद्र चव्हाण, ग्राम महसूल अधिकारी एस. एस. दुधगावकर, अजय पवार, भरत साळुखे, प्रशांत पाटील, डी “एम. सुतार, सहाय्यक कृषी अधिकारी सुरेश बागुल, चाफळ विभागातील गावचे सरंपच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, महसूल सेवक राहुल लोहार, चाफळ मंडल मधील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी. पो- लीस पाटील, सर्व सोसायटी सचिव, अंगणवाडी सेविका, बी. एल. ओ, शेतकरी, ग्रामस्थ व महाईसेवा केंद्र व सी. सी. केंद्रचालक उपस्थित होते.
महा ईं सेवा केंद्रचालक महेश कांबळे यांनी यावेळी २५ फार्मर आयडी कार्यक्रमस्थळी प्रत्यक्ष काढून दिले, त्याचे मान्यवरांच्या हस्ते शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले. मंडलाधिकारी राजेंद्र चव्हाण यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले.
नायब तहसीलदार पी. डी. पाटील यांनी यावेळी महसूल पंधरवड्या अंतर्गत राबवण्यात येणारे शासनाचे उपक्रम तसेच योजनांबाबत माहिती दिली. सदर पंधरवड्यात पाणंद रस्ते विषयक मोहीम, सर्वासाठी घरे उपक्रम व पात्र लाभार्थ्यांना पट्टेवाटप मोहीम, तसेच नावीन्यपूर्ण उपक्रम यामध्ये जिवंत ७/१२ तील अ. पा. क. नोंदी कमी करणे, एकुमॅ नोंदी कमी करणे, एकाच गावातील समान नावाच्या व्यक्ती शोधून त्यांचे नावापढे आईचे नाव ७/१२ वर दाखल करणे संजय’ गांधीव श्रावण बाळ योजनेतील पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाम देणे, ईं-पीक पाहणी, गाव नकाशावरील रस्त्यांची माहिती उपलब्ध करणे.
अग्री स्टॅग रजिस्ट्रेशन (फार्मर आय. डी. रजिस्ट्रेशन), शालेय विद्यर्थ्यांना’ डोमिसाईल दाखले वितरण, अपंग कटंब प्रमखांना अत्योदय शिधापत्रिका देणे याबाबत मार्गदर्शन केले. शासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या नावीन्यपूर्ण उपक्रमांर्गत राबवण्यात येणाऱ्या महसूल विभागाच्या योजनांची माहिती दिली. यादिवशी अनेक शेतकन्यांनी दिवसभरात फार्मर’ आयडी स्वतः कॅम्पमध्ये उपस्थिती लावून उपलब्ध केला आहे.




