तीन वर्षापासूनच्या फरारी आरोपीस जेरबंद
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनची कौशल्यपूर्ण कामगिरी

कात्रज/लोकसत्य न्यूज : मागील तीन वर्षापासून फरारी असलेल्या आरोपी युवराज सुदाम देवकाते रा. हांडेवाडी, पुणे यास भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांनी अटक केली असून पुढील चौकशी संबंधित अधिकारी करत आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी भारती विद्यापीठ पोलीस ठाणे पुणे शहर गुन्हा रजिस्टर नंबर 189/2023 भा.द.वी. कलम 307, 143, 148,149, 323, 504, क्रिमिनल अमेंटमेंट ऍक्ट कलम 7 महाराष्ट्र पोलीस अॅक्ट कलम 37 (1)(3) आर्म ॲक्ट कलम 4(25) या गुन्ह्यांमध्ये मागील तीन वर्षापासून फरार असलेल्या युवराज सुदाम देवकाते, वय वीस वर्षे, राहणार सध्या होळकरवाडी, शंकर मंदिराजवळ, हांडेवाडी, पुणे मूळ राहणार साळवे गार्डन, साईनगर, कोंढवा बुद्रुक, पुणे याचा भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम पु. साळगावकर यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस अंमलदार नितेश चोरमले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, किरण साबळे हे शोध घेत असताना आरोपी युवराज सुदाम देवकाते हा कान्हा हॉटेलच्या बाजूला थांबला आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने नमूद अधिकारी व अंमलदार यांनी कात्रज कोंढवा रोडवरील कान्हा हॉटेल जवळ जाऊन आरोपीचा शोध घेतला असता तो मिळून आल्याने त्यास नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे, श्री प्रवीण कुमार पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडल दोन, श्रीमती स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, श्री राहुल आवारे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सावलारामपूर पु. साळगावकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राहुल कुमार खिलारे तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार नितेश चोरमले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, किरण साबळे, सचिन सरपाले, महेश बारवकर, मंगेश पवार, सचिन गाडे, निलेश खैरमोडे, तुकाराम सुतार, संदीप आगळे यांच्या पथकाने केली आहे.



