क्राईमग्रामीणमहाराष्ट्रसंपादकीय
पिस्तूल बाळगणाऱ्या इसमास आंबेगाव पोलिसांकडून अटक
आंबेगाव पोलिसांची कौशल्यपूर्ण कामगिरी

आंबेगाव/पुणे : पिस्तूल बाळगणाऱ्या इसमास आंबेगाव पोलिसांकडून अटक करण्यात आले असून पुढील तपास मा. पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी मा. पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी पुणे शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कोबिंग ऑपरेशन व गुन्हे प्रतिबंधकचे अनुषंगाने गस्त करणे बाबत आदेशित केले होते, त्या अनुषंगाने आंबेगाव पोलीस स्टेशनचे हद्दीत मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शरद झिने यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी प्रियंका गोरे हे तपास पथकासह दत्तनगर परिसरात गस्त करीत असताना पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे व निलेश जमदाडे यांना खास बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, “आई श्री व्हिला अपार्टमेंटचे बाजूला एका गाईच्या गोठ्यामध्ये एक इसम अंगात काळ्या रंगाचा गोल गळ्याचा हाफ टी-शर्ट व काळी ट्रॅक पॅन्ट अंगाने मजबूत असलेल्या इसमाकडे फिस्तल आहे.




