
चाफळ/उमेश सुतार : चाफळ येथील जिल्हा परिषद शाळेसमोर असलेल्या विञ्ञराज मोबाइल शॉपीचे शटर उघड्रन अज्ञात व्यक्तींनी दुकानात प्रवेश करून चार मोबाइल व पाच हजार रुपये चोरून नेल्याची घटना मंगळवारी दुपारी दोन – वाजता उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच चाफळ पोलिसानी पाहणी ‘केली.
अधिक तपास केला असता शेजारी असलेल्या हॉटेलमधील महिलेस एक लहान मूल दुकानाच्या शटरशेजारी कावरेबावरे होऊन घृटमळत “असल्याचे निदर्शनास आले असल्याची माहिती मिळाली असून त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे . याबाबत ‘अधिक माहिती अशी, मगळवारी दुपारी विघ्नराज मोबाइल शॉपीचे मालक अभिजित साळुखं हे दकानाचे शटर बद करून घरी जेवण करप्यासाठी गेले होते.
गणेशोत्सव असल्याने खरेदीसाठी बाजारपेठेत भरपूर् गर्दी होती याचाच फायदा घेऊन अज्ञात व्यक्तींनी पाळत ठेवून द्कानाचे शटर उचलून लहान मूलाला आत पाठवून मोबाइल व रोकड लंपास केली असल्याचा सशय पोलिसाना व्यक्त केला आह. पोलिसानो तपासाची चक्रे फिरवली असन दुकानाच्या शेजारी दुपारी घुटमळत असलेल्या मुलाचाव त्याच्याबरोबर असलेल्या व्यक्तींचा शोध पोलीस घेत आहेत. शिंगणवाडी येथील लक्ष्मण रामचद्र जमाले यांचादेखील मोबाइल याच दरम्यान अज्ञात व्यक्तीने चोरी केला असल्याची तक्रार पोलिसात दाखल झाली आहे.
याबाबत कुणाला माहिती असेल तर पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन चाफळ पोलास दूरक्षत्राचे उपपोलीस निरीक्षक रामराव वेताळ सिद्धनाथ शेडगे यानी केले आह.



