महात्मा गांधी विद्यालयातील तीन अध्यापकांना गुणवंत शिक्षक सन्मान

राजगुरुनगर, (लतीफ शाह) दि. १४ : खेड तालुका एज्युकेशन संचालित महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील एक अधिकारी व दोन अध्यापकांना जिल्हा गुणवंत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
खेड तालुका माध्यमिक मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर संघाच्या वतीने जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. राजगुरुनगर येथील रिद्धी सिद्धी मंगल कार्यालयामध्ये पुरस्कार वितरण सोहळा नुकताच संपन्न झाला.

महात्मा गांधी विद्यालयाच्या प्राचार्या संध्या कांबळे यांना जिल्हा गुणवंत मुख्याध्यापक, अध्यापक अब्दुल रहमान इनामदार व अध्यापिका कांचन शेलार यांना जिल्हा गुणवंत अध्यापक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर, आमदार बाबाजी काळे, माजी आमदार दिलीप मोहिते, माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, पुणे माध्यमिक विभागाचे जिल्हा शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर, जिल्हा शिक्षणाधिकारी संजय नाईकडे, गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले, राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे सचिव नंदकुमार सागर, जिल्हा संघाचे विश्वस्त हनुमंत कुबडे, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव शिवाजी कामथे, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष हरिश्चंद्र गायकवाड, हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाचे प्राचार्य शिरीष पिंगळे, खेड तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष व संयुक्त संघटनेचे कार्याध्यक्ष संजय बोरकर, सचिव रामदास रेटवडे, मुख्याध्यापक संघाचे सचिव रामदास पवार, विश्वस्त मधुकर नाईक आदी उपस्थित होते.

शिक्षण क्षेत्रातील सात मान्यवरांना ‘राजगुरू रत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये डॉ. भाऊसाहेब कारेकर, बाळासाहेब राक्षे, अमोल जंगले, डॉ. राजेश बनकर, बाळकृष्ण वाटेकर, संभाजी पवार व उत्तम पोटवडे यांचा समावेश होता. त्यानंतर एक विषय तज्ज्ञ, ३४ मुख्याध्यापक, ११४ शिक्षक व १३ सेवक मिळून एकूण १६९ जणांना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे संयोजन योगेश माळशिरसकर, बाळासाहेब वायकर, विलास आदलिंगे, सतीश देवरे, काशिनाथ पोखरकर, लतीफ शेख, अरविंद गवळे, राजेंद्र खरमाटे, निलम कदम, उत्तम खेसे, भालेराव कड पाटील, रवींद्र चौधरी, सुनील कड यांनी केले.




