रेल्वे ट्रॅकवर ठिया आंदोलन करणार : वसीम इनामदार
परिसरातील चाळीस गावातील जनतेला होणारा त्रास आटोक्यात आणावा

तारगाव /प्रतिनिधी : तारगांव रेल्वे स्टेशन जवळील भुयारी मार्ग (RUB) अत्यंत खराब स्थितीमध्ये असल्याने त्याचा त्रास सर्वसामान्य लोकांना सहन करावा लागत आहे, त्यामुळे १५ सप्टेंबर, सोमवार रोजी सायंकाळी आंदोलन करण्याबाबत लेखी निवेदन मा. निरिक्षक, रेल्वे सुरक्षा बल, सातारा यांना मा. श्री. वसिम मगबुल इनामदार अध्यक्ष, कराड उत्तर विधानसभा शेतकरी संघटना यांनी दिले आहे.

यावेळी इनामदार म्हणाले की, तारगांव रेल्वे स्टेशनच्या जवळचा भुयारी मार्ग अत्यंत खराब स्थितीत आहे. येण्याजाणाऱ्या लोकांना व शाळेतील मुलांना त्याचा अतोनात त्रास होत आहे. शिवाय पावसाळयात गुढघ्याभर चिखल व पाणी साठत आहे, त्यामळे मोटार सायकल व इतर वाहनांचे अपघात सारखे होत असतात. काही दिवसांमध्ये ऊस वाहतुक सुरु होईल, व ये-जा करणाऱ्या लोकांच्या जिवाला खुप मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
कृपया दोन्ही बाजंचे रस्ते काँक्रीटीकरण व पुलाखाली पाण्याचे आऊटलेट रेल्वे प्रशासनाने करुन द्यावे ही आमची आग्रहाची मागणी आहे. तसेच रस्ता तयार होईपर्यंत शाळेतील मुलांना ये-जा करण्यासाठी पादाचारी मार्गाचे वापर करण्यास मोफत पासेस मिळावे अशीही विनंती केली.

लोकशाही मार्गाने हे निषेध आंदोलन भुयारी मार्ग (RUB) येथे करत आहे. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास व लेखी उत्तर रेल्वे प्रशासनाकडून मिळाले नाही तर, तारगांव रेल्वे स्टेशन परिसरात ४० हुन अधिक गावे आहेत. शाळेतील मुलांना व लोकांच्या जिवाशी झालेला हलगर्जीपणाही शेतकरी संघटना होऊ देणार नाही.
थोड्याच दिवसात एक मोठा लढा उभा करुन निदान २०,००० हुन अधिक लोक रेल्बे ट्रँकवर ठिय्या आंदोलन करतील आणि त्याची पूर्ण जबाबदारी रेल्वे प्रशासनावर राहील याची गांभर्याने दखल घेण्यात यावी, अशी विनंती मा. श्री. वसिम मगबुल इनामदार अध्यक्ष, कराड उत्तर विधानसभा शेतकरी संघटना यांनी केली आहे.




