चाफळ/उमेश सुतार : येथील विभागात अतिवृष्टीमुळे घरांची पडझड चापळसह विभागात गेले दहा दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाने हाहाकार माजवला आहे.
विभागातील सात गावातील 11 घरांच्या भिंतीची पडझड होण्याच्या घटना घडल्या आहेत. विभागातील बोर्गेवाडी, कोळेकरवाडी, डेरवण, खोनोली, मसुगडेवाडी, बहिरेवाडी, जाळगेवाडी या ठिकाणी घरांच्या भिंतीची पडझड झाली आहे. या पडझडीची पाहणी पालकमंत्री शंभूराजे यांचे सूचनेनुसार संजय गांधी निराधार अध्यक्ष भरत साळुंखे, कारखान्याचे संचालक प्रशांत पाटील, चंद्रकांत पाटील, शिवाजी बोंगाणे, मनोहर कडव, योगेश जाधव, संभाजी डांगे यांनी केली.
अतिवृष्टीत नामदेव बोर्गे (बोरगेवाडी), बाळासो बबन कोळेकर, आनंदा दादू कोळेकर, सीताबाई गंगाराम कोळेकर, शंकर मधुकर कोळेकर सर्व राहणार कोळेकरवाडी, शालन शहाजी सोनवणे, डेरवण, जनार्दन जगन्नाथ तोडकर, खोनोली, सुरेश हरिभाऊ पवार व नारायण खाशावा पवार, मसुगडेवाडी/दाढोली, गणेश रामचंद्र कोळेकर बहिरेवाडी यांच्या घराच्या भिंतीची पडझड झाली आहे, तर बाळकृष्ण दिनकर काटे जाळगेवाडी यांच्या घराचा पत्रा उडून गेला आहे.




