
प्रशालेत सुसंस्कृत आचार व विचार यांच्या आदान-प्रदानातून अभिवादन
महर्षीनगर-स्वारगेट (श्री. बी. व्ही.जाधव सर) : गुलटेकडी येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या कै. कॅ. शिवरामपंत दामले प्रशालेमध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न,महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. प्रशालेचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री. रमेश वसईकर सर यांनी प्रतिमा पूजन व पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले.

यावेळी पर्यवेक्षक मा. श्री. अनिल तंवर सर व शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. मा. मुख्याध्यापक श्री. वसईकर सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब जयंतीनिमित्तत्यांच्या जीवन चरित्रातील समाजासाठी हितावह, प्रेरणादायी, सर्वसमावेशक घटना प्रसंग व अनुभवांची शि दोरी आत्मचरित्रातून उलगडत डॉ. बाबासाहेबांच्या विचारांची प्रेरणा जनमानसात रुजावी, यासाठी फक्त चरित्र ऐकण्यापेक्षा महापुरुषांच्या चरित्रांचे वाचन करा ते विचार समाजात आणि मनात रुजवा व
आचरणातून प्रगट करा, यासाठी जगदीश ओव्हाळ लिखित ‘जग बदलणारा बाप माणूस ‘ हे बाबासाहेबांचे आत्मचरित्रपर पुस्तकाचे वाचन करा, असे आवाहन डॉ. प्रज्ञा इंगळे मॅडम यांनी मनोगतातून व्यक्त करत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्रेरणादायी गीतगायन करत सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे आभार प्रशालेचे क्रीडाशिक्षक श्री. दत्तात्रय हेगडकर सर
यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

