

पुणे/लोकसत्य : राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले उद्योगभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल बाबाजीनगर, कात्रज येथील मल्टी जिनीयस कंपनीचे डायरेक्टर व सामाजिक कार्यकर्ते फिरोज शेख सर यांचा सत्कार समारंभ आयोजीत करण्यात आला होता.
यावेळी रुपेश बाबर यांच्यासह भागातील विविध क्षेत्रातील नामांकीत पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचारांनी महाराष्ट्र घडला आहे. याच विचारांचा वारसा पुढे नेत समाजात सामाजिक सलोखा आणि माणुसकी जपण्यातच खरा आनंद व परमार्थ दडलेला आहे, असा संदेश सध्या सर्वत्र दिला जात असल्याचा संदेश कात्रज येथील मल्टी जिनीयस कंपनीचे डायरेक्टर व सामाजिक कार्यकर्ते फिरोज शेख यांनी दिला.
आजच्या काळात केवळ भौतिक प्रगती महत्त्वाची नसून, एकमेकांप्रती असलेला आदर आणि मदतीची भावना हीच खरी संस्कृती आहे. महापुरुषांनी शिकवलेली समता आणि बंधुभाव हाच महाराष्ट्राचा मूळ पाया आहे. हाच धागा पकडून समाजातील विविध स्तरांतून माणुसकीचे दर्शन घडवणारे उपक्रम राबवले जात आहेत.
या सामाजिक सलोख्याचा आणि समतेचा संदेश देणारा एक विशेष व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून, तो प्रत्येक नागरिकाने आवर्जून पाहावा असा आहे.
“माणुसकी हाच खरा धर्म आणि सामाजिक सलोखा हीच आपली खरी ताकद आहे.” असल्याचे मत राहुल खरात, पुणे (मुळगाव आटपाडी) यांनी व्यक्त केले.

