आकुर्डी/पुणे : बोबड्याचे बोल, संस्काराचे मोल
आजी-आजोबाच घरातील देव आहे, प्रत्येक कुटुंबाची ठेव…,संस्काराची खाण देवाचा मान आजी-आजोबा आमच्या कुटुंबाची शान.., अशा अनेक बिरूदवाल्यांनी कुटुंबालाच देवालयाचा सन्मान प्राप्त करून देणाऱ्या आजी-आजोबा विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजी आजोबा मेळाव्याचे आयोजन नवनगर शिक्षण मंडळाचे संस्थापक मा. प्रा. डॉ. श्री. गोविंदरावजी दाभाडे सर यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याध्यापक श्री राजू माळे, श्री संदीप जाधव यांच्या उपस्थितीत आकुर्डी येथील श्री सरस्वती बालक मंदिरात करण्यात आले होते.
या कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन व ईशस्तवन तसेच स्वागत गीताने करण्यात आली. यावेळी शिक्षण मंडळाचे संस्थापक मा. प्रा. डॉ. श्री दाभाडे सर यांनी पालक व आजी आजोबांना मार्गदर्शन करत संस्कार, स्नेह,आपुलकी,आदर, प्रेम, ऋणानुबंध, उत्तम आचरण, या सर्वांचे कुटुंबातील व शिक्षणातील महत्त्व समजावून देत, आजी-आजोबांची कृतज्ञता व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. स्वाती जाधव- पाटील यांनी केले तर निवेदन सौ. शांता हराळे यांनी केले. संगीत शिक्षक श्री. प्रकाश कोळप, श्री. अमोल गुंड, श्री. विनोद गोयर या शिक्षकांचे सहकार्य लाभले.
यावेळी बालक मंदिराच्या श्री. व सौ.सुनीता संभाजी पवार, श्री. व सौ. अन्नपूर्णा शिवाजी दलबंजर, श्री. व सौ. शोभा नवनाथ शिंदे, श्री. शिव्वप्पा हेळवार व सर्व आजी आजोबा व पालकांनी आपली उपस्थिती दर्शवून नातवंडाचा आंनद द्विगुणित केला.