पुणे-गुलटेकडी : येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या कै. कॅ. शिवरामपंत दामले प्रशालेमध्ये मा. मुख्याध्यापक श्री. रमेश वसईकर सर व कलाशिक्षिका सौ. मेधा हिंगे यांच्या मार्गदर्शनाने प्रशालेतील इयत्ता सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी एम्बॉस चित्रकला कार्यशाळेचे आयोजन प्रशालेच्या प्रांगणात करण्यात आले होते. या चित्रकला कार्यशाळेमध्ये इयत्ता सहावी ते नववीच्या १५५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
यावेळी प्रशालेच्या कलाशिक्षिका सौ. मेधा हिंगे, कार्यशाळा प्रमुख सौ. ऍमी पेणकर व सौ. तृप्ती जाधव यांनी सर्व विद्यार्थ्यांना एम्बॉस चित्रकला पेंटिंग संदर्भात माहिती व विविध पद्धतीने एम्बॉस चित्रकला व वॉटरप्रूफ टेक्निकचा वापर कसा करावा, या विषयी मार्गदर्शन करत कार्यशाळेतून सुंदर चित्रकृती तयार करून घेतली.
यावेळी विद्यार्थ्यांनी चित्रकला व वॉटरप्रूफिंग टेक्निक संदर्भात शंका व प्रश्न विचारत आपल्या ज्ञानात भर घातली. अनेक विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत उत्तम मार्गदर्शन संपादित करत चित्रकृतीची निर्मिती केली. यावेळी कार्यशाळेत उत्कृष्ट पेंटिंग करणाऱ्या चि. दुर्व खिलारे,(६
अ), चि. श्रीतेज खलसे (७अ), कु. धनश्री कुंभार(८ब), चि. हेमंत घरजाळे (९ब) या विद्यार्थ्यांचे मा. मुख्याध्यापक रमेश वसईकर सर व प्रशालेच्या कलाशिक्षिका सौ. मेधा हिंगे यांनी बक्षीस देऊन कौतुक व अभिनंदन केले.