राजगुरुनगर/लतिफ शाह सर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कॉमर्स विभागातून डॉ. दर्शना मयूर घुमटकर यांनी बँकिंग अँड फायनान्स या विषयामध्ये Ph.D पदवी संपादित केली आहे.
नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळाचे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय येथील केंद्रात त्यांनी संशोधन कार्य केले. डॉ.पी.एस.साळवे, डॉ. जे. पी. भोसले, प्राचार्य डॉ. ए.बी.कुलकर्णी व हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाचे माजी प्राचार्य हरीभाऊ जरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपले संशोधन कार्य पूर्ण केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.बी.कुलकर्णी यांनी त्यांना सन्मानित करत विशेष प्रशंसा केली. या यशाबद्दल शिक्षण क्षेत्रातील सहकारी, मान्यवर, नातेवाईक व मित्रपरिवाराकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.